राज्यात सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस बरसला!
मुंबई, दि. 01 - महाराष्ट्रासाठी आज तांत्रिकदृष्ट्या पावसाळा संपला आहे. देशात आणि राज्यातही यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. आनंदाची बाब म्हणजे चार वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा सरासरीच्या 21 टक्के जास्त पाऊस पडला आहे.
देशात 1 जून ते 30 सप्टेंबर या काळातील सरासरीच्या 3 टक्के कमी पाऊस पडला. देशात सरासरी 883.6 मिमी पाऊस पडतो, यंदा 857.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 3 टक्के कमी पाऊस पडला. मराठवाडा आणि कोकण-गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडला. संपूर्ण राज्याचा विचार करता महाराष्ट्रात या काळात 1002.7 मिमी पाऊस पडतो. यंदा 1159.7 मिमी म्हणजे सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस पडला आहे.