सुधाकर शिंदे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी
मुंबई, दि. 01 - नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधाकर शिंदे हे सध्या नगरविकास विभागात उपसचिव आहेत. सुधाकर शिंदे हे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे बंधू आहेत.
नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे महापालिकेचे नवे उपायुक्त असतील, अशी आधीच घोषणा झाली होती. मात्र, आयुक्त कोण असतील, याबाबत उत्सुकता होती. अखेर सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.