Breaking News

शांतीच्या मार्गातूनच देशांचे संरक्षण शक्य : राज्यपाल

नाशिक, दि. 25 - संवेदनशील, शांत मन आणि शांततेचा पुरस्कार करणारी समृद्ध संस्कृतीच संरक्षणाचे काम करू शकेल. वाढत्या असुरक्षिततेच्या काळात सैनिक किंवा बाँबपेक्षा शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून हे काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस, गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या 19व्या जागतिक शांतता परिषदेचे उद्घाटन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते झाले. डॉ. अनिल काकोडकर यांचा पहिला डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यपालांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. बी. पंडित यांनी लिहिलेले प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांचे चरित्र, एसएमआरके महाविद्यालयातील टेक्सटाईल्स विभागाच्या प्रमुख डॉ. कविता पाटील यांच्या महावस्त्र ऑफ महाराष्ट्र- पैठणी‘ या पुस्तकांचेही या वेळी प्रकाशन झाले.