Breaking News

सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले

मुंबई, दि. 24 - गेल्या शनिवारी इराणसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय कबड्डी संघाने इराणला 39-29 ने धूळ चारत कबड्डीच्या विश्‍वचषकावर आठव्यांदा आपले नाव कोरले. भारतीय संघाने हा चषक सलग तिसर्‍यांदा आपल्या नावावर केला आहे. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन भारतीय संघाचे अभिनंदन केले. याशिवाय त्याने ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला पुन्हा सुनावले.
भारतीय कबड्डी संघाने विश्‍व चषक जिंकल्यानंतर वीरेंद्र सेहवागने दोन ट्विट केले. यातील पहिल्या ट्विटमध्ये वीरुने भारतीय संघाचे अभिनंदन केले. तो म्हणाला की, हा उत्साह, हे स्पिरीट, हम को दे दे ठाकूर!!!! अजय ठाकूर तू रॉकस्टार आहेस. पराभवातूनही विजय खेचून आणणार्‍याला टीम इंडिया म्हणातात! चॅम्पियन्स!!!
यानंतर वीरुने आपल्या दुसर्‍या ट्वीटमधून ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनची कोंडी केली. वीरुने आपल्या दुसर्‍या ट्वीटमध्ये, भारताने कबड्डी या खेळाला जन्म दिला, अन् आठवेळा विश्‍व चॅम्पियन बनला. पण काही देश असे आहेत, ज्यांनी क्रिकेटला जन्म दिला. पण सध्या टायपोजच दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत.