Breaking News

दहशतवादाचे मूळ पाकमध्येच, पाकिस्तानची कबुली

इस्लामाबाद, दि. 25 - दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच पोसले जात असल्याचे पाकिस्ताननेही कबूल केले आहे. पाक सरकारकडून जैश-ए-महम्मदच्या मसूद अजहरसह 5 हजार 100 दहशतवादी संघटनांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत.
देशात दहशतवादी असल्याचे पाकिस्तानने अधिकृतपण मान्य केले आहे. खाते गोठण्यासाठी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने 5 हजार 100 दहशतवाद्यांची यादी बँकांना पाठवली आहे. पाकिस्तानात बसून जगभरात दहशत माजवणार्‍या दहशतवाद्यांचा या यादीत समावेश आहे. दहशतवाद्यांच्या खात्यात एकूण 40 कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. जैश-ए-महम्मदच्या मसूद अजहर याचे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील खातेही गोठवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये 27 दहशतवाद्यांचे खाते आहेत.