Breaking News

भारतात परतण्यासाठी मल्ल्यांनी तातडीची परवानगी मागावी - परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली, दि. 16 - उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात परतायचे असल्याचे त्यांनी तातडीच्या परवानगीची मागणी करावी असे गुरूवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून  सांगण्यात आले. आपले पारपत्र रद्द केल्यामुळे आपण भारतात परतू शकत नसल्याच्या मल्ल्या यांच्या आरोपाचे परराष्ट्र मंत्रालयाकडून आरोपाचे खंडन करण्यात आले. 
कोणताही भारतीय आपल्या जवळील दुतावासात किंवा उच्चायुक्तालयात जाऊन आपल्या देशात परतण्यासाठी तातडीची परवानगी घेऊ शकतो. कोणत्याही भारतीय  नागरिकाच्या दृष्टीने याचे मिळणारे परवानगीचे पत्र हे भारतात येण्यासाठी महत्वाचा दस्तऐवज आहे आणि मल्ल्या यांनादेखील अशा प्रकारे परवानगी घेता येऊ शकेल,  असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. यापूर्वी मल्ल्या यांनी आपल्याकडे पारपत्र नसल्याने आपण भारतात येऊ शकत नसल्याचे न्यायालयाला  सांगितले होते.