Breaking News

शिवपाल यादव यांनी दिला मंत्री पदाचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. 16 - समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी आपल्या मंत्री पदाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर  समाजवादी  पक्षातून हकलपट्टी केलेल्या गायत्री प्रजापति यांनी  शिवपाल यांची भेट घेतली. पदाचा राजीनामा दिल्यानंतर यादव यांच्या घराच्या बाहेर समर्थका मोठ्या संख्येने  उपस्थित झाले.
शिवपाल यांनी पदाचा राजीनामा देण्यासह त्यांना देण्यात आलेल्या सरकारी गाडीचाही त्याग केला आहे. तसेच ते सरकारकडून देण्यात आलेले घरही सोडून देणार  असल्याचे सांगण्यात येत आहे. आपला दबाव निर्माण होण्यासाठी ते असे करत असल्याची चर्चा होत आहे.