एअरटेल, आयडिया, व्होडाफोन एमएनपीची सुविधा देत नसल्याचा रिलायन्स जिओचा आरोप
मुंबई, दि. 16 - एअरटेल, आयडिया, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओ यांच्यातील इंटरकनेक्शन पोर्टच्या मुद्द्यानंतर आता या दूरसंचार कंपन्या आपल्याला पोर्टची सुविधा देत नसल्याचा आरोप रिलायन्स जिओने केला आहे. मोबाईल नंबर पोर्टेबलिटीच्या विनंत्या कोणते ना कोणते कारण देऊन या दूरसंचार कंपन्या नाकारत असल्याचा आरोप जिओकडून करण्यात आला आहे. याबाबत रिलायन्स जिओने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. मोबाईल नंबर पोर्टेबलिटीचा मुद्द्यावर ट्रायबरोबर झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे व्होडाफोनच्या एका प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना जिओची सेवा घेण्यासाठी पाठवलेल्या एमएनपीच्या विनंत्या फेटाळत आहेत. कंपन्यांकडून करण्यात येणारे हे कृत्या दूरसंचार कंपन्यांना देण्यात येणा-या परवान्यांच्या नियमांच्या विरोधातील आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या कंपन्यांना समज दिली पाहिजे. त्यानंतरही कंपन्यांकडून हे सुरू राहिल्यास त्यांचा परवाना रद्द केला गेला पाहिजे असे जिओने ट्रायला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान भारती एअरटेलला एमएनपीसाठी पाठवण्यात आलेल्या 83 विनंत्या त्यांनी कोणते ना कोणते कारण देऊन रद्द केल्या असल्याचे जिओकडून सांगण्यात आले.