अडचण असेल तिथे आघाडीच ः प्रतिक पाटील
सांगली, दि. 13 - अडचण असेल तिथे आघाडीची गरज भासते. नगरपालिकेच्या कारभाराची जोरदार चर्चा असून शहर विकासापासून दूर आहे. विकास हा अजेंडा घेऊन नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय एकवटले आहेत. पालिका निवडणुकीत आष्टा शहर विकास आघाडीला संधी द्या, असे आवाहन करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडी होणार असल्याचे सूतोवाच केले.
आष्टा शहर विकास आघाडीच्यावतीने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, वीर कुदळे, शिवसेनेचे पोपट भानुसे, अमोल पडळकर, राहुल थोटे, स्वाभिमानीचे गुंडाभाऊ आवटे, राजकुमार सावळवाडे, बाबासाहेब कुलकर्णी, डॉ. सतीश बापट प्रमुख उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, आष्टा, इस्लामपूर शहराचा विकास केवळ नावापुरता झाला आहे. आष्ट्यासारख्या ठिकाणी व्यवसाय वाढत नाही. औद्योगिकरण नाही, रोजगार नाही, शहर दुर्लक्षित वाटतंय.
केवळ निवडणुकीपुरते काम नको, आमच्याकडून फारशा अपेक्षा बाळगू नका. स्थानिकांनी पुढाकार घ्या. बदल घडवा. अडचण असेल तिथेच आघाडीची गरज भासते. शहरातील सर्वपक्षीय विरोधक एकवटले. सत्तेत नसताना ते धडपड करतात. शहर विकास आघाडीला एकदा संधी द्या.
मकरंद देशपांडे यांनी एकीची वज्रमुठ काय राहील यासाठी मदत करु, अशी ग्वाही दिली. वीर कुदळे, विक्रम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
शिबिरात एक हजार जणांची आरोग्य तपासणी झाली. लाभार्थींना आधारकाठी, चष्म्यांचे वाटप झाले. अमोल पडळकर यांनी स्वागत केले. बाबा भानुसे यांनी आभार मानले.