एम्ब्रेअर विमान करार प्रकरणी चौकशीचे आदेश
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर, : संरक्षण मं
त्रालयाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या 20.8 कोटी डॉलरच्या एम्ब्रेअर विमान करारात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला आणि अंमलबजावणी संचालनालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा करार 2008 मध्ये ब्राझिलियन विमान निर्माता एम्ब्रेअर आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटने दरम्यान झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्ब्रेअर विमान करारात लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला असून हा आरोप गंभीर असल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाला आणि अंमलबजावणी संचालनालयाला चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. एम्ब्रेअर विमान करारात गौरव्यवहार झाल्याचे आढळून आल्यास केंद्रीय अन्वेषण विभाग चौकशी करेल, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले होते.