लेंगरेतील बलात्कार प्रकरण, संशयित फरारी
लेंगरे (ता. खानापूर), दि. 13 - येथे गेल्या चार महिन्यांपूर्वी एका पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करुन चिे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच, या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल धनाजी ऐवळे (रा. लेंगरे) हा फरार झाला आहे.
सायंकाळी 6.30 वाजता नवी मुंबई पोलिसांनी हा गुन्हा विटा पोलिस ठाण्याकडे वर्ग केला असून पोलिस उपअधिक्षक अमरसिंह निंबाळकर, पोलिस निरिक्षक मोहन जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नील घोंगडे यांच्यासह पोलिसांनी लेंगरे येथे आरोपीच्या घरी धडक दिली. मात्र गेल्या 4 दिवसांपासून तो फरारी झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
लेंगरे येथील पीडित बालिका व तिचे आई, वडील नवी मुंबई येेथे स्थायिक आहेत. मे महिन्यात यात्रेनिमित्त ही बालिका व तिचे आई, वडील लेंगरे येथे मूळ गावी आले होते. यात्रा संपल्यानंतर आई, वडील मुंबईला परत गेले. मात्र शाळेला सुटी असल्याने ही बालिका तिच्या आजीजवळ लेंगरे येथे राहत होती. तिच्या घराशेजारी वाजंत्री म्हणून काम करणारा विशाल ऐवळे राहतो. 22 मे 2016 रोजी 2.30 वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून मुख्य संशयित विशाल याने तिला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करुन लैंगिक शोषण केले.
सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिस उपअधिक्षक अमरसिंह निंबाळकर, पोलिस निरिक्षक मोहन जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल घोंगडे, हवालदार अधिकराव वणवे लेंगरे येथे गेले.मात्र संशयित विशाल ऐवळे याच्या घराला गेल्या 4 दिवसांपासून कुलूप असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील संशयित ऐवळे फरारी झाला असून त्याच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रात्री उशिरा विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.