मोटरमनसाठी इंजिनमध्ये लवकरच एसी, शौचालय ः सुरेश प्रभू
नवी दिल्ली, दि. 13 - मोटरमनची आता 60 डिग्री तापमानात काम करण्यापासून सुटका होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मोटरमनच्या सोयीसाठी इंजिनमध्ये लवकरात लवकर शौचालय आणि एसी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनकडून या मागणीसाठी सातत्याने चार वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. अखेर या संघटनेच्या मागणीवर ‘प्रभू’कृपा झाली आहे. इंजिनमध्ये एसी लावल्यामुळे मोटरमनची इंजिनच्या गरम वातावरणात काम करण्यापासून सुटका होणार आहे. महिला मोटरमनच्या समस्यांसाठी शौचालयाची मागणी जोर धरत होती. त्यालाही मान्यता मिळाली असून एसी आणि शौचालय तयार करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर केलं जात आहे. देशभरातील मोटरमनला या निर्णयाचा फायदा होणार आहे.