Breaking News

कावेरीचं पाणी पेटलं, 56 बस जाळल्या, 16 ठिकाणी कर्फ्यू

मुंबई, दि. 13 -   कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रचंड धुसफूस सुरु आहे. बंगळुरुत 16 पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर काल एकाच डेपोतील तब्बल 56 बस पेटवण्यात आल्या. प्रशासनाने तणाव निवळण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिसांना रस्त्यावर उतरवलं आहे.
पुढचे 10 दिवस दररोज तामिळनाडूला 12 हजार क्युसेक्स पाणी सोडा, असे आदेश काल सुप्रीम कोर्टानं कर्नाटकला दिले आहेत. या आदेशविरोधात काल दिवसभर बंगळुरु, म्हैसूरसह इतर शहरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचं सत्र पाहायला मिळालं. ज्यात तामिळनाडूच्या शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. तामिळनाडूच्या अनेकांना बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान बंगलोरमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिस तैनात करण्यात आलेत. तसंच नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.