ग्रामीण डाक सेवकांचे उपोषण सुटले
प्रवर अधिक्षक गायकवाड यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी), दि. 30 - आखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने ग्रामीण डाक सेवकांच्या प्रलंबीत व आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मुख्य डाक कार्यालया समोर चालू असलेले उपोषण तीसर्या दिवशी प्रवर अधिक्षक ए.व्ही. गायकवाड यांनी सदर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडविले.प्रवर अधिक्षक गायकवाड, सहा. अधिक्षक डी.वाय.देशमुख व विपणन अधिकारी यु.डी. शेख यांनी सदर प्रश्ना संदर्भात उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच काही प्रश्न विभागीय पातळीवरचे असल्याने पी.एम.जी. पुणे येथे सोडवणुकीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ए.एस.पवार, जी.टी.र ाजगुरु, आर.एस.राहिंज, एन.बी.जहागीरदार, बी.ए.गिरमकर, पी.व्ही. किंबहूणे, एस.एस.श्रीमंदीलकर, विजयकुमार एरंडे, तात्या किंबहूणे, अशोक बंडगर, अशोक जाधव, वसंत जाधव, बी.व्ही.दरदंडे, बादशाह शेख, सुरेश मैड, सलिम शेख आदिंसह ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते.
ग्रामिण डाक सेवकांनी कर्जत उपविभाग डाक निरीक्षक कुमटकर यांच्याकडून डाक सेवकांना मिळणार्या अपमानास्पद वागणुकिची चौकशी करुन त्यांची बदली करावी. रिक्त असलेले ग्रा.डा.से. शाखा डाकपाल, डाक वितरक, थैली वाहक यांच्या जागा तातडीने भराव्या. सेवकांना सायकल देखभाल भत्ता सन 2006 पासूनचा फरक मिळावा. शाखा डाकघराच्या हीशोबी थैल्या उपडाकघरा पर्यंन्त ने आण करण्यासाठी आर्थिक मोबदला मिळून, एस.टी. बसनेच थैल्या वहण पुर्ववत करावे. ग्रा.डा.से. डाक वितरक (जी.डी.एस.एम.डी.) यांची थैली वाहक (जी.डी.एस.एम.सी.) पदनाम असल्याने होणारी आर्थिक नुकसान थांबवावी. ग्रा.डा.से. ग्रामीण डाक जीवन विमा, बचत खाते आणि समबध्द खाते (आर.पी.एल.आय., एस.बी. टी.डी.) यांची प्रोत्साहन देयके त्वरीत मंजूर करावी. ग्रा.डा.सेवकांना जानेवारी 2015 चा वेतनवृध्दीचा फरक त्वरीत मिळण्याची मागणीसाठी उपोषण सुरु करण्यात आले होते.