Breaking News

भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे म्हणजे न्यायालयाचा अवमान : अ‍ॅड.कारभारी गवळी

मोर्चाला जाति निब्बान मोहिमेचा विरोध
अहमदनगर (प्रतिनिधी), दि. 30 -  महात्मांच्या नावांचा वापर करुन, जे भ्रष्टात्मा झाले. समतेच्या नांवावर ज्यांनी विषमता पोसली अशा भुजबळांना कारागृहा बाहेर काढण्यासाठी मोर्चा काढणे म्हणजे न्यायलयाचा अवमान आहे. यासाठी पुढाकार घेणार्‍यांच्या मागे भुजबळांचा पैसा काम करत असल्याचा आरोप अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी केला.
या आंदोलनाला जाति निब्बान मोहिमेचा विरोध असून, यामुळे लोकशाहीचे धिंडवडे निघणार आहे. जातीच्या नांवावर काळ्यापैश्यातून ज्यांनी मत विकत घेतली त्यातले भुजबळ एक आहे. ते निर्दोष असतील तर त्यांनी न्यायलयात सिध्द करणे अपेक्षित आहे. कायद्यासमोर सर्व समान असताना, भ्रष्टाचारच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या भुजबळांना समर्थन देणे हे असंवैधानिक आहे. यासाठी समाजात जागृती आनण्यासाठी कॉन्टम कॉन्शसनेस जाति निब्बानची आवश्यकता असल्याचे प्रसिध्दीपत्रकात अ‍ॅड.गवळी यांनी म्हंटले आहे.
जातीच्या राजकारणानेच हे आंदोलन पेटवले जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जाति निब्बान भारत आचारसंहितेचा प्रयत्न चालू आहे. सार्वजनिक ठिकाणी व शासकिय कार्यालयात जाति निब्बानची आवश्यक असून, प्रत्येकाकडे भारतीय या भावनेनेच पाहण्याची गरज असल्याचे प्रकाश थोरात यांनी सांगितले आहे.
समाजातील जात हद्दपार करण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने जाति निब्बानची शपथ घेतली पाहिजे. शासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना ही शपथ देऊन त्याची अंमलबजावणीची गरज आहे. नाहीतर आजही आपले लोकप्रतिधी, राष्ट्रपती व पंतप्रधान आपली जात प्रदर्शित करताना दिसतात. यातून लोकशाहीचे मुल्ये पोखरले जात असल्याची खंत अशोक सब्बन यांनी व्यक्त केली आहे.