Breaking News

विसापूर तलाव पाणीभरण जनआंदोलनाच्या वतीने कुकडीचे पाणी विसापूर तलावात सोडण्यासाठी आंदोलन

04 ऑक्टोंबरला जिल्हाधिकारींना घेराव

अहमदनगर (प्रतिनिधी), दि. 30 - दहा गावांना पाणी पुरवणारे विसापूर तलाव 70 टक्के कोरडे असताना, तलावात कुकडी कॅनोलचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी विसापूर तलाव पाणीभरण जनआंदोलनाच्या वतीने मंगळवार दि.04 ऑक्टोंबर रोजी आंदोलन करुन, जिल्हाधिकार्यांना घेराव घालणार असल्याची माहिती आंदोलनाचे प्रमुख राजाराम जठार यांनी दिली.
 जिल्ह्यात चांगल्या प्रकारे पाऊस होऊन डिंबे, पिंपळगाव जोगा, वडूज, येडगाव येथील धरण पुर्णत: भरले आहे. या धरणामधून ज्या भागात पाण्याची गरज नाही त्या भागाला पाणी सोडले जात आहे. दुष्काळाच्या चौथ्या वर्षीही विसापुरचे तलाव कोरडेच आहे. परिसरातील मुंगूस गांव, सुरेगांव, उक्कल गांव, सारोळा, चांबुर्डी, कोरे गव्हाण, निंभवी, विसापूर, पिंपळगाव पिसा, रांजणगांव आदि या तलावर निर्भर आहे. येथील ग्रामस्थांना पाण्याच्या अडचणीचा सामना करावा लागत असून, टँकरद्वारे त्यांना पाणी आनावे लागत आहे. खोसपुरी पाणी योजना या तलावावर अवलंबून असल्याने तलावात तातडीने कुकडी कॅनोलचे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
आ.राहुल जगताप व माजी आ.बबनराव पाचपुते यांच्या राजकारणच्या संघर्षाचा फटका येथील 10 गावांच्या ग्रामस्थांना बसला आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासठी दहा गावातील शेतकरी एकत्र येऊन संघर्ष करणार आहे. तसेच कृष्णा खोरे विकास योजनेमध्ये विसापूर तलावचा समाविष्ट करण्यासाठी लवकरच खंडपिठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात राजाराम जठार यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात सरपंच सुभाष शिर्के, गंगाराम गावडे, विनायक आढाव, दादासाहेब ढगे, बबन ढगे, विलास लाकुडजोडे, मएश ढगे, शेखर साळवे, विजय गवळी, बापू लगड, बंडू पंधरकर, कायदे सल्लागार अ‍ॅड.कारभारी गवळी, विजय जठार, सुदाम सोमवंशी आदिंसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.