गणित आणि इंग्रजी विषयांना लवकरच पर्याय : तावडे
पुणे, दि. 13 - गणित आणि इंग्रजी विषय कठीण वाटणार्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तसे संकेत दिले आहेत.
गणित आणि इंग्रजीमध्ये नापास होणार्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या, त्या विषयी वाटणारी भीती विचारात घेत, या विषयांना पर्याय म्हणून काही भक्कम पर्याय पुढे आणू शकतो का, या विषयी सध्या शिक्षण खात्यामध्ये विचार सुरु आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणंत्री विनोद तावडे यांनी दिली. शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने काम सुरु आहे. गेल्या आठ-दहा वर्षांमधील बोर्डाच्या निकालांचे विश्लेषण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे., अशीही माहिती विनोद तावडे यांनी दिली. त्यामुळे इंग्रजी आणि गणित या विषयांची भिती वाटणार्या विद्यार्थ्यांना लवकरच नवीन पर्याय मिळून दिलासादायक बातमी मिळू शकते.