पत्नीशी अफेअरच्या संशयातून भावाची हत्या
डोंबिवली, दि. 13 - चुलतभावाचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून डोंबिवलीतील एका तरुणाने भावाचा काटा काढायचा डाव आखला. मात्र हे हत्याकांड कधी घडवायचं, याचा मुहूर्त शोधण्यासाठी त्याने चक्क एका मांत्रिकाकडे धाव घेतली. हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सतीश रसाळ या तरुणाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत एका रिक्षाचालकाला आढळला. डोंबिवलीतील गॅलक्सी फर्निचर हब परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवरच सतीशचा मृतदेह होता. त्याचा मोबाईल फोन, पाकिट आणि इतर वस्तू गहाळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डोंबिवलीचा रहिवासी असलेला सतीश रस्ते कंत्राटदार होता. तीन मुली आणि पत्नीसोबत तो निळजे गावात राहत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सतीशचा चुलतभाऊ जयदीपची पत्नी चार वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. मात्र कोणीच तिची तक्रार नोंदवली नाही. उलट जयदीपने मित्र चंदनच्या मदतीने बाबा परशुराम पाटील या मांत्रिकाकडे धाव घेतली.
पत्नी जिवंत आणि खुशालीत असल्याचं मांत्रिकाने जयदीपला सांगितलं. त्याचप्रमाणे लवकर तुमची भेट घडेल, अशी हमीही मांत्रिकाने जयदीपला दिली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जयदीपची भेट पत्नीशी झाली. तिला आपल्या मुलांची आठवण येत असल्याने एका मैत्रिणीच्या मदतीने तिने जयदीपशी संपर्क साधला. पत्नीच्या पुनर्भेटीने जयदीपचा आनंद गगनात मावेनासा झाला, मात्र तेवढ्यात त्याला आपली पत्नी गेल्या सहा-सात महिन्यांपासून आपल्या चुलतभावाच्या संपर्कात असल्याचं समजलं. यामुळे जयदीपच्या मस्तकात तिडीक गेली आणि दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचा संशय बळावला. जयदीपने पुन्हा मांत्रिकाला गाठून चुलतभावाच्या हत्येसाठी मुहूर्त काढण्यास सांगितलं. गुरुवारी रात्रीचा मुहूर्त योग्य असल्याचं मांत्रिक बाबा पाटीलने सांगितल्यावर त्याच्या आणि मित्र चंदनच्या मदतीने जयदीपने आपल्या चुलतभावाची हत्या घडवून आणली. याप्रकरणी 34 वर्षीय जयदीप, त्याचा मित्र चंदन आणि 75 वर्षीय मांत्रिक बाबा पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे.