रिओ पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाला सुवर्ण
रिओ डि जनैरो, दि. 16 - रिओ पॅरालिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक गुड न्यूज आहे. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक ऋ46 इव्हेंटमध्ये देवेंद्र झांझरियाने सुवर्णवेध घेतला. झाझरियाच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत 2 सुवर्ण पदक, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक जमा झालं आहे.
विशेष म्हणजे झाझरियानं 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. 62.15 मीटर इतक्या विक्रमी थ्रोसह त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. यंदा स्वतःचाच विक्रम मोडित काढत 63.97 मीटरची विक्रमी नोंद केली. जागतिक क्रमवारीत तो तिसर्या स्थानी आहे. 35 वर्षीय देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे. देवेंद्र झाझरियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने तर 2012 मध्ये पद्मश्रीने गौरवलं आहे. हा सन्मान पटकावणारा तो पहिला पॅरालिम्पिकपटू आहे.