विराटकडून खूप शिकायला मिळते : विल्यमसन
नवी दिल्ली, दि. 16 - न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश होत असला तरी विनयशील स्वभावामुळं त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत. केन विल्यमसनने विराटचं भरभरुन कौतुक केलं आहे.
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पाहून पाहून आपल्याला फलंदाजीचे बारकावे शिकायला मिळाले, असं सांगून विल्यमसननं विराटची महान फलंदाजांमध्ये गणना केली.
कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅट्समध्ये प्रतिस्पर्धी आक्रमणावर वर्चस्व गाजवण्याची विराटची गुणवत्ता खास असल्याचं सांगून, त्याच्याविषयी आपल्या मनात आदर असल्याचं विल्यमसननं स्पष्ट केलं. विराटची फलंदाजी पाहायला आपल्याला भावतं आणि त्याच्याकडून खूप काही शिकता येतं, असंही त्यानं बोलून दाखवले.