बालाजीची फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली, दि. 16 - टीम इंडियाचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने 16 वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीला पूर्ण विराम दिला आहे. बालाजीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र आयपीएल आणि तामिळनाडू प्रिमीयर लीगसाठी खेळणार असल्याचं सांगितलं आहे.
बालाजीने टीम इंडियामध्ये दमदार पदार्पण केलं. मात्र सततच्या दुखापती आणि खराब कामगिरीमुळे संघात स्थान निश्चित करण्यात त्याला अपयश आलं. त्यामुळे बालाजीचं आंतरराष्ट्रीय करिअर लवकरच संपुष्टात आलं. प्रथम श्रेणी क्रिकेटला 16 वर्ष दिल्याचा आनंद आहे. मात्र आता कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, असं बालाजीने निवृत्तीची घोषणा करताना सांगितले.
बालाजीने टीम इंडियाकडून 8 कसोटी सामन्याचं प्रतिनिधित्व करत 27 विकेट नावावर केल्या. तर 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत. बालाजीला टी-20 मध्ये टीम इंडियाच्या वतीने केवळ 5 सामन्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने 10 विकेट नावावर केल्या. बालाजीने निवृत्तीची घोषणा करताना संघातील जुन्या आठवणींना उजाळाही दिला. माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि माजी गोलंदाज झहीर खानच्या नावाचा बालाजीने आवर्जून उल्लेख केला. झहीरने आपल्याला नेहमी खेळण्यासाठी प्रेरणा दिली, असं बालाजीने सांगितले.