घाणीचे साम्राज्यामुळे नागरिक साथीच्या आजाराने हैराण
। सर्वच रुग्णालयात मोठी गर्दी । नगरपालिकेचे नागरिकांच्या भाषणाकडे दुर्लक्ष
श्रीगोंदा (प्रतिनिधी)। 13 - श्रीगोंदा नगरपालिकेने श्रीगोंदा शहरातील नाल्याची स्वच्छता, शहरातील उघडयावरील कचरा, पाणीपुरवठा व आरोग्याच्या समस्येवर लक्ष केंद्रीत नसल्यामुळे श्रीगोंदा शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या घाणीमुळे श्रीगोंदा शहरासह तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे .त्यामुळे तालुक्यातील रुग्णालये हाऊस फुल झाली आहेत त्यामुळे अजून किती दिवस पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहे असा सवाल नागरिकांना पडला आहेश्रीगोंदा नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे श्रीगोंदा नगरपालिकेने श्रीगोंदा शहरातील नाल्याची स्वच्छता, शहरातील उघडयावरील कचरा, पाणीपुरवठा व आरोग्याच्या समस्येवर लक्ष केंद्रीत केले नसल्यामुळे श्रीगोंदा शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या घाणीमुळे श्रीगोंदा शहरासह तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे .त्यामुळे तालुक्यातील खाजगी रुग्णालये हाऊस फुल झाली आहेत शहरामध्ये डेंग्य,चीकूनगुनिया, मलेरिया, अतिसार उलट्या - जुलाब आदी साथीच्या आजाराने श्रीगोंदेकर हैराण झाले आहेत श्रीगोंदा शहरामध्ये डेंग्युचे थैमान चालू असून गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात लागण झाल्यामुळे गोर गरीब जनतेची परवड चालू आहे . शहरातील गल्ली बोळी व वाड्या वस्तीवरील नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे ते उपचारासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेले असता तेथे त्यांची दखल न घेतल्यामुळे गरीब जनतेला खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागते. तर काही रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यात खाजगी दवाखान्यात कर्ज काढून तेथे उपचारासाठी जावे लागते . या कडे नगरपालिकेचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून श्रीगोंदा शहरातील बुरुड गल्ली , होळीगल्ली ,झेंडाचौक, काळकाई चौक , गांजुरेमळा, शनिचौक , आमदार राहुल जगताप ऑफिस शेजारी , तहसील कार्यालय ,पोलीस ठाणे, कॉलनी आदी परिसरात साठलेले अस्वच्छ पाणी, नाल्यातील झाडे झुडपे, कचरा, या सर्व अस्वच्छतेमुळे डासांची मोठया प्रमाणात पैदास झाली आहे. नाल्याच्या शेजारी वास्तव्यास असणार्या नागरीकांना तीव्र दुर्गंधी, अस्वच्छता व डासांचा मोठा सामना करावा लागतो. यामुळे या भागांत डेंग्युची साथ पसरली असल्याने त्वरीत या समस्येचे निराकरण करावे तसेच शहरातील गटारी नाला,काचारा डेपो या ओढयाला घाणीच्या साम्राज्यातुन मुक्त करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी नागरीकातून मागणी होताना दिसत आहे .