अभेद प्रतिष्ठाणच्या पाककला स्पर्धेत रेणुका सारडा प्रथम
। महिला व युवतींचा उर्त्स्फुत सहभाग । खाद्य पदार्थ बनवून आकर्षक थाळीची सजावट
अहमदनगर (प्रतिनिधी)। 13 - गणेशोत्सवा निमित्त सारसनगर येथील अभेद्य प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचा शुभारंभ नगरसेविका शितल जगताप व सुवर्णा जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ.निलीमा भंडारी, डॉ.सचिन भंडारी, सौ.अलकाताई मुंदडा, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मयुर विधाते, जिल्हा क्रिकेट असो. चे सचिव प्रा.माणिक विधाते, राहुल गाडळकर, राजेंद्र आवारे, बाळासाहेब विधाते, प्रा.शिवाजी म्हस्के, बाळासाहेब विधाते, नवनाथ नवले, आदीनाथ शेडाळे, संतोष कराळे, राज गीते, महेश राऊत, समीर खडके, अजिंक्य विधाते, दर्शन विधाते, अजय घोलप, शुभम विधाते, श्रीकांत कचरे, गौरव विधाते, सुभाष जगताप आदि उपस्थित होते.पाककला स्पर्धेत महिला व युवतींनी उत्सफुर्त सहभाग घेऊन विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थ बनविले. यामध्ये चना दाळपासून ढोकळा, समोसा, पुरणाचे दिंडे, फ्रुटी हलवा, चनादाल कटलेट, महाराष्ट्रीय खांडवी, उंबर भाजी, चना दाल पोटली, इंडियन बेसन पिझ्झा, शेव पराठा आदिंसह विविध खाद्य पदार्थ बनवून आकर्षकपणे थाळीची सजावट करण्यात आली होती. पाककला स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली. प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
पाककला स्पर्धेत रेणुका सारडा प्रथम विजेत्या ठरल्या. प्रथम विजेत्या सारडा यांना मंडळाच्या वतीने तीन हजार रु., द्वितीय विजेत्या अलका कालाणी यांना दोन हजार रु., तृतीय स्वाती नागोरी यांना एक हजार रु. व उत्तेजनार्थ श्रेया बंग व ममता आसेरी यांना पाचशे रुपयाचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. पाककला स्पर्धेचे परिक्षण सुरेखा मनियार व पुष्पा सोनी यांनी केले. प्रश्न मंजुषा स्पर्धेत लहान मुले व युवतींनी सहभाग घेऊन विविध आकर्षक बक्षिसे मिळवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड.सुनिल मुंदडा यांनी केले.