हुतात्मा विलास शिंदे यांच्या तेराव्या दिवशी आईचे निधन
सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) : मुंबई येथे कर्तव्य बजावताना झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेले वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या तेराव्याच्या विधीवेळी त्यांची आई कलावती शिंदे यांना हृदय विकाराचा झटका आला त्यात त्यांंचे निधन झाले. या घटनेमुळे शिंदे कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला.
खार पश्चिमेला पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावताना अल्पवयीन मोटारसायकल चालकाला कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी अडवले होते. वाहनचालक लहान असल्याने त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला बोलवायला सांगितले. आपल्या भावाला परवाना विचारल्याचा राग आल्याने अहमद कुरेशी याने कॉन्स्टेबल शिंदे यांच्या डोक्यात दांड्याने फटका मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विलास शिंदे यांच्या शिरगाव या गावात सोमवारी तेराव्याचा विधी सुरू होता. त्यावेळी त्यांच्या आई कलावती शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सून, नातवंडे असा परिवार आहे.