पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात: कोल्हापुरच्या दोघांचा मृत्यू
सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील बोरगाव येथे झालेल्या अपघातात कोल्हापुर येथील 2 तरूण ठार झाले. तर अन्य 5 जण जखमी झाले आहेत.
कोल्हापुरातील काही युवक पुण्यात गणपती दर्शनासाठी इर्टिगा (एमएच 09 उन 9292) गाडीतून जात होते. पण त्यांना महामार्गावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला एक तरूण दिसला. रस्त्यावर पडलेला हा जखमी अचानक दिसल्याने इर्टिगा कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे इर्टिगा जागेवरच पलटी झाली. या अपघातात इर्टिगामधील राकेश मोहन निगवे (30) जागेवर ठार झाले तर श्रीपाद सुरेश पेटकर (33) यांचे रुग्णालय निधन झाले. दोघे कोल्हापुरातील शाहुपुरी 5 वी गल्ली येथील आहेत. दिनेश महावीर कान्सरी (29), रोहीत दिलीप नष्टे (25), पैरस पद्मकुमार भिवटे (25), साईनाथ कुमार डोईफोडे (25), रोहन विजयनाथ सांगावकर हे जखमी झाले. त्यापैकी साईनाथ डोईफोडे यांची प्रकृती चिंताजनक आहे.