बोर घाटात टेम्पोने अचानक घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक धीम्या गतीने
पुणे, दि. 29 - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (गुरुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोने अचानक पेट घेतला. यामध्ये टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला.
खोपोली महामार्ग पोलीस व आयआरबीच्या अधिकार्यांनी सांगितले की, टेम्पो क्र. (एचआर 61 बी 1243) हा सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, विद्युत साहित्य व कपडे घेऊन पुण्याकडे निघाला होता. त्यावेळी घाटातील चढणीवर टेम्पोला शाँर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामध्ये यातील साहित्या आणि टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला.
या घटनेनंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. साडेनऊच्या सुमारास आयआरबी कंपनीचे 3 अग्नीशमन बंब व खोपोली नगरपरिषदेचा 1 अग्नीशमन बंब च्या सहाय्याने सदर आग विझविण्यात आली. दरम्यान विस्कळीत झालेली वाहतूक पुर्वपदावर येण्यास आणखी तासभर लागण्याची शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.