Breaking News

दुचाकींच्या धडकेत तरुण ठार

प आटपाडी, दि. 29-  येथील दिघंची रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सचिन नारायण सुतार (38) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नांव आहे. दहा वाजण्याच्या सुमारास दिघंचीहून सचिन सुतार दुचाकीवरुन (क्र. एम.एच. 10, ए. व्ही. 4439) येत असताना, समोरुन नवनाथ चंद्रकांत शिंदे (26, रा. आटपाडी) हे दुचाकीवरुन (क्र. एमएच. 42, एल 9421) येत असताना या दोघांच्या वाहनांची धडक झाली. या अपघातात सचिन सुतार गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर संतोष शिंदे यांना तातडीने सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अनिल नारायण सुतार यांनी संतोष शिंदे यांच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुधाकर देढे करीत आहेत.