Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित - अमित शहा

नवी दिल्ली, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असल्याचे ट्विट भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले.
पाकव्याप्त काश्मीर आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्कराने केलेल्या नियंत्रित हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले. लष्कराने केलेल्या या कारवाईबाबत त्यांचे आणि पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष बाब म्हणजे आपले यात कोणतेही नुकसान झाले नाही, असे त्यांनी म्हटले. मुख्य म्हणजे दहशतवाद्यांशी समोरासमोर प्रथमच लढाई झाली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. यामुळे एक नवा भारत उदयाला येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काल लष्कराने केलेल्या कारवाईत 42 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आणि दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त करण्यात आले.