पेट्रोलच्या किंमतीत 28 पैशांनी वाढ; डिझेल स्वस्त
नवी दिल्ली, दि. 01 - पेट्रोलच्या किंमतीत 28 पैशांनी वाढ तर डिझेलच्या किंमतीत 6 पैशांची कपात करण्याचा निर्णय आज पेट्रोलिअम कंपन्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढीमुळे पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. महिन्याभराच्या कालावधीत सलग तिस-यांदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. नवे दर लागू झाल्यानंतर नवी दिल्लीतील पेट्रोलचे दर 64 रूपये 49 पैसे तर डिझेलचे नवे दर 52 रूपये 53 पैसै असणार आहेत.
