Breaking News

डेंग्यू, चिकनगुनियाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले

नवी दिल्ली, दि. 30 -  दिल्लीतील डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रभाव पाहता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतेने घेत दिल्ली सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. या याचिकेवरील पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अधिकारी वर्ग आपल्या जबाबदार्‍या स्विकारत नाहीत, असे दिल्ली सरकार कसे काय सांगू शकते, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. अधिकार्‍यांवर केलेला हा गंभीर आरोप आहे. सरकारने या सर्व अधिकार्‍यांची नावे न्यायालयाला द्यावीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयात आपण उघडपणे असा आरोप केला असल्यामुळे पुढील सुनावणीवेळी द्यावीत. तसेच ही नावे बंद पाकिटात नसावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले. अधिकारी जबाबदारी स्विकारत नाहीत. याबाबतची सर्व कागदपत्रे नायब राज्यपालांकडे आहेत आणि अधिकारी सहकार्य करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सत्येंद्र जैन यांनी सरकारच्यावतीने न्यायालयात सादर केले होते.