Breaking News

देशासाठी बलीदार समजासाठी रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान-रा.पो.नि. महेश लांडगे

ताडकळस प्रतिनिधी, दि. 13 -  ताडकळस पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक श्री महेशजी लांडगे यांच्या संयोजनाखाली दि. 9 सप्टेंबर 2016 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना श्री लांडगे साहेब म्हणाले कि, देशासाठी अनेक महामानवाची आपल्या प्राणाचे बलीदान दिले. त्या बलीदाना एवढेच गरजु,दुखित, पिडीत, लोकासाठी जे रक्तदान करतात ते रक्तदान म्हणजेच सर्व श्रेष्ठ दान आहे. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगीतले यावेळी ताडकळस परिसरातील 107 जणानी स्वच्छेने रक्तदान करून समाजाप्रती असलेली निष्ठा सेवाभावी युती आणि देशभक्तीच्या योगदानाचे दर्शन घडविले. ताडकळस परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, सदस्य, सामाजीक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला या रक्त संकलनासाठी श्री हुजुर साहेब रक्तपेढीच्या कर्मचार्‍यानी अतिमहत्वाची भुमीका बजावली रक्त संकलनासाठी परभणी येथील डॉ. नागेश्‍वर खंटीग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचार्‍यानी रक्तदानाची संपुर्ण प्रक्रीया पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपोनि महेशजी लांडगे, सपोनी दिलीप इंगळे, बिट जमादार उत्तमरावजी किरडे साहेब, माधव जंगम, निळे सर, पठान सर, भालेराव साहेब, खटींग सर, शिंदे सर, पवार सुरनर, कच्छवे, फारूकी साहेब, तेलंगसाहेब, दिलीप बोराडे, अनिता राठोड, निश, खरात, कनकुटे, पवार साहेब, आदि जणांनी परिश्रम घेवुन हा कार्यक्रम यशस्वी केला.