आ. राहुल पाटील यांच्या प्रयत्नामुळे परभणी फेस्टीव्हला संजीवनी
परभणी/प्रतिनिधी, दि. 13 - परभणीचे तत्कालीन नगराध्यक्ष माजी आ. सुरेशराव देशमुख यांच्या प्रेरणेने परभणी फेस्टीव्हलचे आयोजन मोठ्या धुमधडाक्यात शहरात करण्यात येत होते. परंतु नगर पालिकेच्या उदासिनतेमुळे व कंगालखोरीमुळे हा फेस्टीव्हल मागील अनेक वर्षापासुन बंद पडला हेाता. आ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातुन यावर्षी परभणी विधानसभा शिवसेनेच्या वतीने गणेश फेस्टीव्हल - 2016 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हल मध्ये धार्मीक, सांस्कृतिक, क्रिडा अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी शहर वासीयं उपभोगत असुन नामवंत सिनेतारका, सिने कलावंत, गायकांची उपस्थिती रहाणार आहे. या गणेश फेस्टीव्हल सोहळ्यास 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन 11 सप्टेंबर रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या जिवन चरित्रावर आधारीत अनंत कोटी नाटक सादर झाले तर 12 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणुन भारताची ऑलिम्पीक कन्या ललिता बाबर या होत्या तर सायंकाळी 6 वाजता हिंदी चित्रपट सृष्टीतील नायिकांचा फिल्मस्टार नाईट आर्केेस्ट्रा सादर झाला या कार्यक्रमात अभिनेत्री इशा कोपीकर, पुजा हेंगडे, मुग्धा गोडसे, मानसी नाईक, नेहा पेंडसे, नृत्यांगणा रेशम चिटणीस, अमृता पत्की यांचा बहारदार कार्यक्रम झाला दि. 13 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कबडी स्पर्धा दुपारी 2 वाजता संपन्न होणार असुन या स्पर्धेचे उद्घाटक म्हणुन आंतराष्ट्रीय प्रो-कब्बडी लीगचे व भारतीय कब्बडी संघाचे कप्तान राकेश कुमार राहणार असुन ऑलम्पीक पटु दत्तु बोकनळ यांची प्रमुख उपस्थीती राहणार आहे. दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजमा झी टीव्ही प्रस्तुत लिटील चॅम्पस व हास्य सम्राट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बंद पडलेल्या परभणी फेस्टीव्हलला आ. राहुल पाटील यांनी संजीवनी देवुन जिल्ह्यातील विषेतः शहरातील नागरिकांना मेजवाणी उपलब्ध करून दिली असुन कार्यक्रमाच्या आयोजनाने जिल्ह्यातील क्रिडा प्रेमींना व रसीकांना लाभ होणार आहे. आ. राहुल पाटील यांनी स्वखर्चातुन या कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्ह्याच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला आहे. मनपाच्या उदासिनतेमुळे परभणीकरांचा भ्रम निरास होवुन परभणी फेस्टीव्हल हि संकल्पना काळाच्या पडद्याआड झाली होती. परंतु परभणी शिवसेना विधानसभा द्वारा आयोजीत या परभणी फेस्टीव्हलमुळे ही परंपरा कायम ठेवली जाईल अशी अपेक्षा परभणीकर करत आहेत.