Breaking News

डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला !

नवी दिल्ली, दि. 30 - ज्यांनी आपल्या 20 साथिदारांना गमावले, ज्यांनी उरी हल्ल्याची भळभळती जखम घेऊन इतके दिवस प्रतीक्षा केली, त्याच जवानांनी  आपल्या मित्रांच्या बलिदानाचा बदला घेतला. ज्या भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केले, त्या जवानांमध्ये डोग्रा  रेजिमेन्ट आणि बिहार रेजिमेन्टच्या जवानांचा समावेश होता.
पाक व्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या धडक कारवाईमध्ये डोग्रा रेजिमेन्ट आणि बिहार रेजिमेन्टच्या जवानांनी लीड केल्याची माहिती हाती लागली  आहे. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सर्वाधिक शहीद हे बिहार आणि डोग्रा रेजमेंटचे होते. त्यामुळे आपल्या साथिदारांचा जीव घेणार्‍या अतिरेक्यांचा खात्मा  करण्याची जबाबदारी लष्कराने डोग्रा आणि बिहार रेजिमेटन्वर दिली. 27 आणि 28 तारखेच्या मध्यरात्री या दोन्ही रेजिमेन्टच्या जवानांनी अतिरेक्यांच्या 7 तळांवर  चढाई केली. आणि आपल्या साथिदारांच्या बलिदानाचा बदला घेतला. त्यांनी आपले 20 जवान धारातीर्थी पाडले पण आपल्या सैनिकांनी त्यांच्या 40 जणांचा  खात्मा केला.