भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर अमेरिकेने मौन सोडले!
वॉशिंग्टन, दि. 30 - संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी, असा सक्त संदेश पाकिस्तानला देत व्हाईट हाऊसने भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव कमी करण्याचे आवाहनही केले आहे. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी याबाबत बोलताना सांगितले, उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेल्या स्थितीवर अमेरिकेची नजर आहे. उरीसारखे दहशतवादी हल्ले तणाव निर्माण करणारेच असतात.
व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भारत आणि पाकिस्तानचं लष्कर एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्याच्या चर्चेसाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. अर्नेस्ट यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राइस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. अमेरिकालाही वाटतं की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह इतर दहशतवादी संघटनांची कायदेशीर मान्यता रद्द करावी, असे सुझान राइस यांनी डोभाल यांना सांगितले.