सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट
मुंबई, दि. 30 - पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताच्या पश्चिम समुद्रकिनावर अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईतील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांड अनेक कार्यक्रमांचें आयोजन करते. मात्र सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
1 आणि 2 ऑक्टोबर रोजी सैन्याच्या युद्धनौकेवर सामान्यांसाठी आयोजित केलेले प्रदर्शन रद्द केले आहे. तसेच 3 ऑक्टोबर रोजी एनसीसी कॅडेट, सैनिक स्कूलचे विद्यार्थी, इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी समुद्रात आयोजित केलेले सैन्याचे प्रदर्शन आणि कार्यक्रम रद्द झाला आहे. याशिवाय ऑक्टोबर मध्य आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेव्ही मॅरेथॉन, दिव्यांगांसाठी प्रदर्शन, बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पण सध्या तरी त्यात कोणताही बदल केलेला नाही.