Breaking News

अमृता व अश्‍विनी यांची शालेय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर, दि. 30 - जिल्हा क्रिडा कार्यालय व यंग मेन्स ज्युदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा संकुल नगर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तर शालेय ज्युदो स्पर्धेत दळवीज स्वराज्य क्रिडा अ‍ॅकेडमीच्या दादासाहेब हरिभाऊ घाडगे-पाटील विद्यालयाची कु. अमृता अरविंदो बिश्‍वास इयत्ता 10वी. 48कि.ग्रँ. 17 वर्ष वयोगटाची विद्यार्थींनीने व ज्ञानेश्‍वर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. काकासाहेब सहाने इयत्ता11 वी 49कि.ग्रँ.19 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकवत विभागिय स्पर्धेकरीता जिल्ह्याच्या संघात स्थान पटकाविले आहे.या खेळाडूंना यंग मेन्स ज्युदो संघटनेचे मुख्यप्रशिक्षक अभिजित दळवी व शुभांगी दळवी यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे.
  या यशस्वी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.संजय धोपावकर,तालुका ज्युदो संघटनेचे मार्गदर्शक व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार,बहूजन पञकार संघाचे तालूकाध्यक्ष राजेंद्र वाघमारेे,नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,अ‍ॅड.सुनिल चावरे,सुधीर बोरकर यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.