राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे कय्युम पठाण यांचा आदर्श उपक्रम
अहमदनगर, दि. 30 - राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष कय्युम पठाण यांचेवतीने श्रीरामपूर नगरपालिका उर्दू शाळा क्र.9 संजयनगर येथील 90 विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, बंटी जहागिरदार, युनूस जमादार, माजी उपनगराध्यक्ष नजीर मुलाणी, अमीन सय्यद, नसरीन कय्युम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कय्युम पठाण म्हणाले की, नगरपालिका उर्दू शाळा क्र.5 मधील विद्यार्थ्यांसाठी दफ्तर ओझे कमी करण्यासाठी रॅक, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करुन दिले असून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती केलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आहे. परिसरातील नागरिकांना अडीअडचणीच्या काळात सहकार्य केले असून भविष्यातही असे उपक्रम राबविणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी शाळेचे शिक्षकवृंद नजिया शेख, जमील सर, सलमा शेख, सुफीया शेख यांचेसह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर यांनी केले.