Breaking News

आयफोन 6 एस, 6 एस प्लसच्या किंमतीत 22 हजारांची कपात

मुंबई, दि. 16 - अ‍ॅपलने आयफोन 6एस आणि 6 एस प्लसच्या किंमतीत 22 हजार रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन 6 एसचे 128  जीबीचे व्हेरिअंट आता 60 हजार रूपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 80 हजार रूपये होती. तर दुसरीकडे आयफोन 6 एस प्लस ता 70 हजार रूपयात  मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 92 हजार होती.
 काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपलने आयफोन 7 आणि 7 प्लस हे दोन नवे फोन सादर केले होते. भारतामध्ये या फोनची विक्री 7 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.  कंपनीने याच पार्श्‍वभूमीवर आयफोन 6एस आणि 6 एस प्लसच्या किंमतीत कपात केली आहे. याव्यतिरिक्त आयफोन एसईच्या 64 जीबीच्या व्हेरिअंटच्या किंमतीतही  कपात केली आहे. आता तो फोन 44 हजार रूपयांना मिळणार आहे.