कुर्हाडीच्या घावाने एक जखमी
प विटा, दि. 30- जनावरे चरण्यास सोडल्याच्या कारणावरुन एकाला चौघांनी काठी, स्टिकने मारहाण करुन व मांडीवर कुर्हाडीने घाव घालून जखमी केले. भानुदास नारायण पाटील, (वय 32, भांबर्डे, ता. खानापूर) असे त्यांचे नांव आहे. मारहाण करणार्या महादेव संदीपान पाील (भांबर्डे), गोट्या उर्फ सोन्या शिवाजी वाघमोडे व रावण शंकर वाघमोडे यांच्याविरुद्ध पाटील यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. जखमींवर सांगली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. पाटील हे सुळकाई डोंगरावर जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते.
.
.
