Breaking News

गणराज गणेश मंडळातर्फे ‘साक्षरता अभियान’

मेहकर, दि. 13 - गणराज गणेश मंडळ चनखोरे कॉलनी मेहकर चे अध्यक्ष दत्ता उमाळे व सचिव विनोद बडगुजर सर्व सदस्याच्या वतीने शासनाचे लोकमान्य टीळक गणेश उत्सव अभियाना अंतर्गत साक्षरता अभियाण वर्ग सुरु करण्यात आला असून या वर्गामध्ये 25 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व लोक गुजरातमधील असून व्यवसाय करण्यासाठी मेहकर शहरात दाखल झाले आहेत. मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे यांनी प्रतयक्ष त्यांच्या झोपड्यांमध्ये साक्षरता अभियानाचा वर्ग सुरु केला असून यामध्ये 25 लोक शिक्षण घेत आहेत. त्यांना साक्षर करण्याचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे यांनी घेतला असून त्यांना शालेय साहित्य सुध्दा मंडळाच्या वतीने वाटप करण्यात आले आहेत. गणराज गणेश मंडळ हे कोणत्याही प्रकारची वर्गणी जमा न करता 11 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष हे वेगवेगळे प्रकारचे सामाजीक कार्यक्रमात अग्रेसर असतात. त्यांचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा तेव्हाच खरा गणेश उत्सव साजरा होईल.