विश्रामगृहाला ‘अच्छे दिन’ची प्रतिक्षा!
बुलडाणा, दि. 13 - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या देऊळगांव महि येथील विश्राम गृह अंधारात असून अतिशय दयनिय अवस्थेत आहे. इमारतीला मोठया पटांगणाचा घेराव आहे. परंतू त्याचा कोणताही उपयोग जनतेला होत नाही. नेमका या विश्राम गृहाचा कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न जनतेला पडला आहे. विश्राम गृहामध्ये कोणत्याच ठिकाणीप्रकाश नाममात्रही नाही, आहे तो फक्त अंधार...!
एकीकडे देशाचे पंतप्रधान हातात झाडू घेवून स्वच्छता अभियान राबवतांना दिसत होते. त्यावेळी असं वाटल आता संपुर्ण देशात कुठेच कचरा, घान, साचलेली व गटारे दिसणार नाही. परंतू दे.महि येथील विश्राम गृहाची परिस्थिती बघता हे स्वच्छता अभियान या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी हानुन पाडले असावे? त्यामुळे विश्रामगृहात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिकडे नजर फिरवली तिकडे घानिचे ढीग पहावयास मिळत आहे. विश्रामगृह हे अतिथीसाठी, स्थानिक जनतेसाठी, विश्राम करण्यासाठी उपयोगी असतात. परंतू इथे हे काही न होता विश्राम गृहाच्या पटांगणात चोहिकडे दारुच्या बाटल्या पडलेल्या आहेत. मग प्रश्न उपस्थित होतो की, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना, कर्मचार्यांना पंतप्रधान स्वच्छता अभियान मान्य नाही का? सरकारने राबविलेले अभियान कृतीत आनणे बंधनकारक नाही का? हे झाले विश्राम गृहाच्या दयनिय अवस्थेबाबत. पुढे जावून या संबंधीत कर्मचार्यांनी हद्द केली, मागील दोन वर्षापासुन विश्रामगृहाच्या ध्वजारोहनच करण्यात आले आले नाही. या बाबत पत्रकालिन बातम्याच्या माध्यमातुन अनेकवेळा या अधिकार्यांना कळवले परंतु संबंधित अधिकारी कर्मचार्यांनी त्याला फारसे महत्व दिले नाही, सदर कर्मचारी कायदा पायदळी तुडवितांना पाहावयास मिळत आहे. कोणत्याही शासकीय इमारतीसमोर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व इतर महत्वाच्या दिनी ध्वजारोहन करणे अनिवार्य/बंधनकारक असते या सर्व कायद्यांना अटींना न जुमानता हे अधिकारी मनमानी कारभार करतांना दिसत आहेत. ही या कर्मचार्यांची हुकूमशाहीच म्हणावी लागेल. सार्वजनिक विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे जनतेमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
आजरोजी विश्राम गृहाची परिस्थिती अतिशय दयनिय आहे. विश्रामगृहासमोर मोठे पटांगण आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे फुलबाग फुलवता येतात, निसर्गरम्य वातावरण तयार करता येते परंतू त्यासाठी कर्मचार्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. या अधिकार्यांची इच्छाशक्ती नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला या सर्व गोष्टीचा पुर्णपणे विसर पडला असावा? असे चित्र निर्माण झाले आहे. महिण्याला पगार होताच हे महाशय एटीएमकडे धाव घेत असतात परंतू ज्या कामासाठी यांना पगार मिळतो त्या कर्तव्याचा विसर यांना पडला आहे का? असा सवाल जनता जनार्धन विचारत आहे. या विषयी राजकिय, सामाजीक संघटना सहित लोकप्रतिनिधी मात्र ‘चुप्पी साधुन आहेत. आता प्रश्न पडलाय नेमका झोपी गेलेल्या, कायद्याचा, सरकारचा धाक नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अधिकार्यांना जागे करणार तरी कोणत्र? लोकप्रतिनिधी या प्रश्नाला मार्गी लावून अंधारात पडलेले या विश्रामगृहाला स्वच्छ करुन, विजदिवे लावून ‘प्रकाशमय’ करतील का? विश्रामगृहाचे अच्छे दिन कधी येतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.