सामाजिक न्याय विभागातील अधिकार्यांचे लेखणीबंद आंदोलन
। जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कामकाज ठप्प । 1 सप्टेंबर पासून काळ्याफिती लावून आंदोलन करण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी) । 13 - सामाजिक न्याय विभाग राजपत्रीत अधिकारी संघटना यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून लेखणीबंद आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त माधव वाघ, समाज कल्याण अधिकारी प्रदिप भोगले, विशेष अधिकारी देविदास कोकाटे, एस.एम.लहाने, के.बी.कुलकर्णी, श्रीमती.पी.एस.जाधव, व्ही.डी.मोरे,बी.के.बडे, एम.डी.बोराडे, व गांवडे आदी उपस्थित होते.विविध मागण्यांसाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रीत अधिकारी संघटना यांच्यावतीने सोमवारपासून लेखणीबंद आंदोलन हाती घेण्यात आले आहे. अधिकार्यांनी निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. याप्रसंगी भारत सरकार मेट्रो कोतर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क तसेच इतर सर्व योजनांचा फेर आढावा घेऊन कामाची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन जादाची पदे जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालय नाशिक,उपायुक्त तसेच मुख्यालय स्तराव योजनांचे कामकाज विचारात घेऊन पदे मंजूर करण्यात यावेत, यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. संघटनेतर्फे 1 सप्टेंबरपासून अधिकारी व कर्मचारी राज्य स्तरावर काळ्याफिती लावून आंदोलन सुरु करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पुर्तता होत नसल्याने लेखणीबंद आंदोलन हाती घेण्याचे अधिकार्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सामाजिक न्याय विभागातंर्गत क्षेत्रिय कार्यालयात विविध वर्गातील 40 टक्के जागा रिक्त असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण पडत आहे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पुर्वीय मंजूर कर्मचारी आकृती बंधानुसार पुर्ववत नियमित कर्मचारी कायम ठेवण्यात यावे, व त्यानुसारच जिल्हा स्तरावरील जातीय प्रमाणपत्र पडताळणी समितीचे गठण करण्यात यावे, प्रादेशिक उपायुक्त हे पद सह आयुक्त दर्जाचे करण्यात यावे, समाज कल्याण विभागातंर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालय प्रादेशिक सह आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली असावेत. सामाजिक न्याय विभागातील वाहनांचे निर्लेखण झालेल्या ठिकाणी नवीन वाहन तात्काळ मंजूर करण्यात यावे.