Breaking News

भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीत तुफान राडा

अहमदनगर, दि. 30 -भगवानगडावर दसरा मेळावा होण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने पाथर्डीत बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.  मात्र बैठकीनंतर ठराव देण्यास गेल्यानंतर गडावर तुफान राडा झाला. दसरा मेळावा कृती समितीच्या सदस्यांना गडावरील तरुणांनी धक्काबुक्की करुन बेदम मारहाण  केली. यामध्ये काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे.
पाथर्डीतल्या दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीनंतर सर्वजण महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या भेटीला गेले. त्यापूर्वीच  गडावर परिसरातील नागरिक  मोठ्याप्रमाणात जमा झाले होते. गडावरील गेट बंद करुन कृती समितीच्या नागरिकांना रोखून धरुन घोषणांचा जयघोष सुरु झाला. त्यावरुन दोन्ही गटात चांगलीच  बाचाबाची झाली. या जोरदार बाचाबाचीनंतरही कृति समितीला नामदेव शास्त्रींना निवेदन देता आले नाही. त्यामुळे दसरा मेळावा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत  पार पडतो की, शास्त्री महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलें आहे.