Breaking News

चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात

नवी दिल्ली, दि. 30 - भारताच्या राष्ट्रीय रायफल दलाच्या एका जवानाला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा दावा पाक लष्कराने केला आहे. भारतीय जवानाने  चुकून नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केली. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय जवानाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे.
भारताने काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दरम्यान, पाक लष्कराने पकडलेल्या जवानाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. पण या  जवानाने चुकून नियंत्रण रेषा ओलांडली आणि त्यानंतर पाकने त्याला ताब्यात घेतले अशी प्राथमिक माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. दरम्यान,  पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, हा जवान महाराष्ट्रातील आहे. पण नियंत्रण रेषा ओलंडलेला जवान हाच महाराष्ट्रातील  जवान आहे का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे भारतीय लष्कराकडून जवानाबाबत जेव्हा नेमकी माहिती देण्यात येईल  त्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.