कोल्हापुरात जिलेटीनच्या गोदामात शक्तिशाली स्फोट
कोल्हापूर, दि. 30 - कोल्हापुरातील कागल पिंपळगाव खुर्द इथे जिलेटिनच्या गोदामात शक्तिशाली स्फोट झाला. रात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली.
मुस्तफा महम्मद यांच्या गोदामात जिलेटीनचा साठा होता. मात्र मध्यरात्री तिथे अचानक स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, 12 किलोमीटर अंतरावर आवाज ऐकू आला. आवाजाने जागे झालेल्या नागरिकांना सुरुवातीला हा भूकंप असल्याचे वाटले. मात्र नंतर गोदामात स्फोट झाल्याचे समजले. दरम्यान पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.