काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांविरोधातील याचिका फेटाळली
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना सरकारकडून मिळणा-या निधीविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. केंद्र सरकार फुटीरतावादी नेत्यांना सुरक्षा प्रदान करत आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.
फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच वर्षांत 309 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणा-या लोकांना सुरक्षा प्रदान करणे योग्य नाही, असे जम्मू-काश्मीर सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र न्यायालयाने याचिका फेटळत सरकार ज्या नागरिकांच्या जिवाला धोका आहे त्यांना सुरक्षा प्रदान करते असे सांगितले.