पाकच्या ताब्यात गेलेला जवान महाराष्ट्रातील
धुळे/मुंबई, दि. 30 - नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असे या जवानाचे नाव असून तो धुळ्याचा आहे.
धुळ्यातील बोरविहार गावचा, अवघ्या 22 वर्षांचा तरणाबांड चंदू, 2012 मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झाला. दोनच महिन्यांपूर्वी त्याने राष्ट्रीय रायफल्स जॉईन केली होती. मात्र काल पाकिस्तानने त्याला पकडल्याचं वृत्त आलं आणि धुळ्यासह संपूर्ण देशावर काळजीची लाट पसरली. चंदूचा मोठा भाऊ भूषण चव्हाण हा सुद्धा मिलिट्रीतच आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंट, जामनगर गुजरातमध्ये कार्यरत आहे.