नजन, फिरोदिया व पवार चित्रकलेत प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी) । 13 - लायन्स क्लब अहमदनगर प्राईडच्यावतीने नुकतेच घेण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेत अनुपम नजन, प्रांजल फिरोदिया व प्रदीप पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मुरलीधर सारडा विद्यार्थी भवन येथे झालेल्या चित्रकला स्पर्धेत 680 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
तीन गटात झालेल्या चित्रकला स्पर्धेच्या पहिल्या गटात (नर्सरी ते इ. 1 ली) प्रथम- अनुपम नजन (सेंट मायकल स्कूल, इ.1 ली), दुसर्या गटात (इ.2 री ते 5 वी) प्रथम- प्रांजल फिरोदिया (सेंट मायकल स्कूल, इ.4 थी), तर तीसर्या गटात (इ.6 वी ते 10 वी) प्रथम- प्रदीप पवार (रेसीडेन्शीअल हायस्कूल) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास पहिल्या गटासाठी मॅजिक कार, दुसर्या गटासाठी किड्स स्कुटी व तिसर्या गटासाठी सायकल बक्षिस देण्यात आले. तसेच गटातील द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना आकर्षक बक्षिस देऊन, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष मनयोगसिंग माखिजा, सचिव अभिजीत भळगट, रवी तुमनपेल्ली, डॉ.कृष्णा जाजू, डॉ.नेहा जाजू, हरजितसिंग वधवा, सनी वधवा, डॉ.संजय असनानी, राजकुमार आघाव, सागर पंजाबी, आशिष कुमार, हरमित माखिजा, अभिजीत भळगट, बलजित बिलरा, गगनकौर वधवा, रोहीत धूत, पायल धूत आदिंसह क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लबच्यावतीने सामाजिक कार्याबरोबर विविध शैक्षणिक उपक्रम घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष माखिजा यांनी सांगितले. स्पर्धेचे परिक्षण मीनी धुप्पड, मोना कांबळे व चंद्रकांत अल्ली यांनी केले.