ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेचा झिम्बाब्वे दौरा
हरारे, दि. 30 - श्रीलंकेचा संघ 29 ऑक्टोबरपासून झिम्बाब्वेच्या दौ-यावर येणार असल्याची माहिती काल झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाने दिली. श्रीलंकेचा संघ हरारे येथे यजमान झिम्बाब्वेविरूद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर विंडिजचा संघदेखील झिम्बाब्वेत दाखल होणार असून श्रीलंका-झिम्बाब्वे-विंडिज यांच्यात तिरंगी मालिका रंगणार आहे.
झिम्बाब्वेच्या संघाला फारसे कसोटी क्रिकेट खेळायला मिळते नाही. त्यामुळे तुलनेने बलाढ्य अशा श्रीलंकेशी होणारी कसोटी मालिका ही अणुभवाच्या दृष्टीने महत्वाची ठरेल, असे झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाच्या अधिका-याने सांगितले.