Breaking News

चुकून पाकच्या हद्दीत गेलेल्या जवानाला सोडवणार - राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 30 -  पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या कारवाईनंतर नजरचुकीने पाकच्या हद्दीत गेल्याचे उघडकीस आले आहे. या जवानाला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.
या जवानाचे नाव चंदू बाबुलाल चव्हाण असून याबाबत पाकिस्तानच्या संबंधित अधिकार्‍यांशी मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या जवानाचा काल झालेल्या लष्करी कारवाईत सहभाग नव्हता. चुकून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून तो पाकच्या हद्दीत गेला, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ जंगल असल्यामुळे चुकून रेषा ओलांडून दुसर्‍या देशात गेल्याची ही पहिलीच घटना नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.